जामनेर प्रतिनिधी
सध्याच्या काळात व्यसनाधीनता खुप मोठी समस्या निर्माण झाली असुन विशेषतः युवक वर्गात खुप व्यसन दिसत आहे.गुडखा,गांजा,चरस,दारु यांचा सऱ्यास वापर आता शहर आणि खेड्यात सुद्धा जास्त वाढत आहे.यामुळे घरात, समाजात वाद, भांडणे निर्माण होतात .पैशाचा अपव्यय होऊन गुन्हेगारी सुद्धा वाढत चालली आहे.यामुळे समाजातील,घरात तेढ निर्माण होऊन सगळ्यांचेच नुकसान होत आहे.तेव्हा युवकांनी व्यवसनांपासुन दुर रहावे असे आवाहन जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती यु.एस.वानखडे यांनी केले आहे.
जामनेर न्यायालयात जामनेर तालुका विधी सेवा प्राधिकरण व जामनेर तालुका वकिल संघाच्या विद्यमाने विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ॲड.तृप्ती देठे यांनी आपल्या भाषणात युवकांमधील वाढती व्यसनाधीनता त्यांचे परिणाम तसेच याबाबत असलेले कायदे यांची सविस्तर माहिती दिली.यावेळी जामनेर तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.कमलाकर बारी सचिव ॲड.डिगंबर गोतमारे तसेच सर्व वकिल बांधव, भगिनी,नागरिक न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड.एस.आर.पाटील तर आभार ॲड.देवेंद्र पारळकर यांनी मानले.







