खाकी वर्दीतच PSI ने उचललं टोकाचं पाऊल! धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी


हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पोलीस दलाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित PSI यांनी खाकी वर्दीत असतानाच हे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. PSI यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कोणाला काही सांगितले होते का, तसेच कोणत्या परिस्थितीत त्यांनी हे पाऊल उचलले, याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या मृत्यूमुळे हिंगोली पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

error: Don't Try To Copy !!