जामनेर :- आज दिनांक २९ ऑगस्ट २०२६ शनिवार रोजी जिकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा, जामनेर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी शनिवार व स्वच्छ शनिवार’ या उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आनंददायी शैक्षणिक व मनोरंजक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच स्वच्छ शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत स्वच्छता उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, सामाजिक जबाबदारी, संघभावना आणि आनंदातून शिकण्याची वृत्ती विकसित होण्यास मदत झाली. मुख्याध्यापिका नजराना मॅडम व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला.
शाळेच्या या उपक्रमाचे पालक व परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.




