मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमित्त 15 वा जागतिक क्रीडा दिन साजरा

शेंदुर्णी – येथील आप्पासाहेब आर. बी. गरुड महाविद्यालयाच्या मैदानावर मेजर ध्यानचंद यांची 121 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये तीन संघांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. बी .शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सोयगाव येथे असलेले शिक्षक विशाल निकम हे लाभले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून माजी विद्यार्थी तुषार चौधरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी 30 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे इतर विद्यार्थीही मोठया संख्येने उपस्थित होते. क्रीडा संचालक प्रा. डॉ. महेश पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

error: Don't Try To Copy !!