जळगावात पोलिसांची मोठी कारवाई; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

जळगाव | प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) तयार करण्यासाठी वापरले जाणारे इफेड्रीन तसेच गांजा असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्टच्या रात्री पोलिसांचे पथक संशयित हालचालींवर लक्ष ठेवून असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून एक संशयित व्यक्ती त्या दिशेने येताना दिसला. पोलिसांना संशय आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५१) असे आहे. त्याच्याकडून इफेड्रीन आणि गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख १७ हजार २०० रुपये असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, जप्त करण्यात आलेल्या पदार्थांचा नेमका वापर आणि या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

error: Don't Try To Copy !!