जळगावात वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; ४ पीडित महिलांची सुटका, ३ आरोपींवर कारवाई

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा-हुडको परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत ४ पीडित महिलांची सुटका केली असून ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील एका ठिकाणी बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली. तसेच वेश्या व्यवसाय चालविल्याच्या आरोपावरून ३ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या या कारवाईमुळे पिंप्राळा परिसरातील बेकायदेशीर व्यवसायांवर लगाम बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

error: Don't Try To Copy !!