जामनेरच्या बाजारपेठेत ६५ वर्षीय दुकानदारावर हल्ला; लोखंडी फायटरने कपाळावर वार

जुन्या भांडणाचा वाद पुन्हा उफाळला; सहा जणांविरुद्ध जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल*

*फायटर, लाठी-काठीने मारहाणीचा आरोप: आरोपी अद्याप मोकाट*

*Anchor :* जुन्या भांडणाच्या कारणातून वाद उफाळून येत ६५ वर्षीय किराणा दुकानदारावर लोखंडी फायटर, लाठी-काठीने हल्ला केल्याची घटना जामनेर शहरातील बाजारपेठ परिसरात घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव रामजी जाधव हे जामनेर शहरातील बाजारपेठ परिसरात किराणा दुकान चालवतात. २९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी संदीप भिमलाल पवार याने लोखंडी फायटरने जाधव यांच्या कपाळावर आणि डाव्या बरगडीवर वार केल्याचा आरोप आहे.

तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करत लाठी-काठीने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी संदीप पवारसह सहा जणांविरुद्ध दंग्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत.

error: Don't Try To Copy !!