“मी काहीही करत नाही, नेहमीच मला हवे तसे घडते; यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले” — मंत्री संजय सावकारे
भुसावळ : भुसावळच्या राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला असून, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी चौधरी बंधूंना लक्ष्य करत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “मी काहीच केले नाही, तरी ‘तीसमारखां’ माझ्याच जाळ्यात अडकले!” अशा शब्दांत सावकारे यांनी चौधरी बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ना. सावकारे यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, “मी काहीही न करता नेहमीच मला हवे तसे घडते. यातूनच आता स्वतःला तिसमारखां समजणारे माझ्याच जाळ्यात अडकले,” असे वक्तव्य केले.
त्यांच्या या विधानामुळे भुसावळच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सावकारे यांनी केलेल्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या राजकीय घडामोडींकडे आहे, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
चौधरी बंधूंवर टीकेची धार
यावेळी सावकारे यांनी चौधरी बंधूंच्या राजकीय भूमिकेवर आणि त्यांच्या हालचालींवर जोरदार टीका केली. “मी काहीही करत नाही, तरी परिस्थिती माझ्या बाजूने निर्माण होते,” या आशयाचे वक्तव्य करत त्यांनी विरोधकांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सावकारे यांच्या वक्तव्यामुळे आगामी काळात भुसावळमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः चौधरी बंधू आणि सावकारे गटातील राजकीय समीकरणांवर या वक्तव्याचा काय परिणाम होतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
“तिसमारखां” वक्तव्याची जोरदार चर्चा
सावकारे यांच्या भाषणातील “तिसमारखां माझ्याच जाळ्यात अडकले” हा उल्लेख सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांना थेट आव्हान देणाऱ्या या वक्तव्यामुळे सोशल मीडिया तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सावकारे यांच्या या आरोपांवर चौधरी बंधूंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात ‘सावकारे विरुद्ध चौधरी’ संघर्षाला पुन्हा धार येण्याची चिन्हे दिसत आहेत.
Stay Informed with JBN Maharashtra.com
