वाकडी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उदय शिंदे प्रथम

वाकडी, दि. ४ सप्टेंबर : जि.प. केंद्रशाळा वाकडी येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी (स्पेलिंग पाठांतर) स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाकडी केंद्रातील एकूण अकरा शाळांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व स्मरणशक्तीची कसोटी पाहणारी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मोठ्या गटातून जि.प. शाळा चिंचखेडे ता. वा. येथील इयत्ता पाचवीचा अत्यंत गुणी व हुशार विद्यार्थी उदय सुरेश शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

उदयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये त्याचे वर्गशिक्षक श्री. सोपान किसन पारधी सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच जि.प. शाळा चिंचखेडे येथील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच संपूर्ण गावातून उदयचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

या स्पर्धेसाठी केंद्रसमन्वयक श्री. संदीप पाटील सर, केंद्रप्रमुख श्री. नामदेव पाटोळे सर तसेच वाकडी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून वाकडी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. चौधरी सर यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

error: Don't Try To Copy !!