शहरातील भुसावळ रोडवरील किरण टी सेंटर दुकानाला भिषण आग,आगीत लाखोंचे नुकसान.

जामनेर – शहरातील भुसावळ रोड येथील आय सी आय सी आय बँकेच्या बाजूला असलेल्या किरण टी सेंटर ला दी.१ रोजी लक्ष्मी पूजन दिवाळीच्या दिवशीच अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सविस्तर असे, की दिवाळी असल्या कारणाने किरण टी सेंटर चे मालक किरण झाल्टे हे दुकानाची पूजा करून दुकान बंद करून घरी गेले असता साधारण १० वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली. दुकानात लाखो रुपयांचे चिप्स पाकिटे, मिनरल वॉटर बॉक्स, थंड पेये चे बॉक्स, चहा पावडर, साखर, बिस्कीट पुढे बॉक्स यासह दुकानात असलेले साहित्य मिळून १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फटाका खिडकी मधून दुकानात शिरल्यामुळे आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आग लागल्याची माहिती नगर परिषदेला कळवण्यात आल्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दल घटणा स्थळी दाखल झाले त्यांनी आग आटोक्यात आणली त्यामुळेच बाजूलाच असलेल्या बँकेचे मोठे होण्यापासून वाचवले आहे.एक शांत स्वभावी, अतिशय होतकरू, सर्वांशी प्रेमाने वागणारा माणूस म्हणून किरण झाल्टे यांचे शहारत नाव असून कर्ज काढून त्यांनी चहाचा व्यवसाय उभा केला होता. प्रपंचाचा गाडा हाकताना याच चहाच्या भाड्याने घेतलेल्या दुकानावर व कोल्ड्रिंक्स आणि चिप्स च्या व्यवसायातून ते आपला घर खर्च चालवत होते. पण अचानक लागलेल्या आगीमुळे क्षणात दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे अर्थिक नुकसान झाले आहे.

Oplus_131072
error: Don't Try To Copy !!