प्रतिनिधी -सुपडू जाधव
महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर शहरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.हे स्वच्छता अभियान रविवार, दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता नगरपरिषद चौक, जामनेर येथे सुरू होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन आणि जामनेर माजी नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा असून, नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनला चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.या अभियानात स्थानिक नागरिक, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नगरपरिषद कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जामनेर शहराच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याने नागरिकांनी स्वतः सहभागी होऊन सामाजिक योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
जामनेर शहरात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…
