जळगाव जिल्ह्यातील संताप जनक प्रकार आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
जळगाव : महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अशातच जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगर यात्रा महोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी छेड काढली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी संत मुक्ताईची यात्रा असते. यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, २६ रोजी रात्री केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी यात्रेत गेली असता, काही टवाळखोर तरुणांनी तिची छेड काढली.
या प्रकरानंतर केंद्रीय रक्षा मंत्री रक्षा खडसे यांनी मुलीसह महिलांना घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी त्यांनी मंत्र्यांच्याच मुलीची छेड होत असेल इतरांचं काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात टवाळखोर तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महिलांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आता मंत्र्यांच्या मुली सुरक्षित राहिल्या नसून सामान्य नागरिकांच्या मुलीचे काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.