छत्रपती शिवाजी महाराज महाराजराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन

गारखेडा (ता. जामनेर)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजराजस्व समाधान शिबीर अभियान” दिनांक 23 मे 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राम मंदिर सभागृह, गारखेडा ता. जामनेर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबिरात सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असून, विविध शासकीय विभागांतर्गत येणाऱ्या जनतेच्या समस्या व तक्रारींचे निवारण तत्काळ करण्यात येणार आहे.

या शिबिराचा गारखेडा महसूल मंडळातील तसेच संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

error: Don't Try To Copy !!