कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी

कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप, पहूर येथील कार्यक्रम यशस्वी

पहूर प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पहूर येथे गृहपयोगी वस्तू वाटपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला स्थानिक कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि नियोजनबद्ध कामामुळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचू शकली, ज्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, स्थानिक कार्यकर्ते, नेते आणि पुढारी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहोरात्र मेहनत घेतली. गर्दीचे योग्य नियोजन करून, प्रत्येक पात्र लाभार्थ्याला गृहपयोगी वस्तू मिळाल्याची खात्री केली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत भांडी पोहोचवण्यात आली, याचे समाधान लाभार्थ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत होते.
याप्रसंगी खालील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलीपहूर भारतीय जनता पक्ष कार्यालयांचे प्रमुख राहुल ढेंगाळे, व सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, चेतन रोकडे,जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख तसेच वासुदेव घोंगडे, रामेश्वर पाटील, समाधान पाटील, राजेंद्र पांडे, शाम सावळे, महेश पाटील, लक्ष्मण गोरे, ईश्वर बारी, सलीम शेख, भारत पाटील, संदीप बेढे, मधुकर बनकर, शिवाजी राऊत, शरद बेलपत्रे, योगेश बनकर, शुभम गोधनखेड़े यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले

error: Don't Try To Copy !!