शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
दि.२ डिसेंबर रोजी होत असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज नगरपंचायत कार्यालयात उमेदवारांनी प्रचंड गर्दी केली होती.आज तब्बल ४० जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले.यात नगराध्यक्ष पदासाठी ४ जणांनी तर सदस्यांसाठी ३६ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.भाजपच्या वतीने निवडणुक लढवणाऱ्यांची मोठी यादी असुन महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी सौ.उज्वला काशिद यांनीही आपला अर्ज दाखल केला असुन भाजपचे दोन दिग्गज नेते गोविंद अग्रवाल अमृत खलसे यांनी सुद्धा आज अर्ज दाखल केले आहेत.पक्षाच्या वतीने
आपल्यालाच ए.बी.फॉर्म मिळेल अशी सगळ्याच इच्छुकांची आशा आहे.अजुन काही दिग्गज नेते नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे कळते आहे.मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीत मात्र हम साथ साथ है असे चित्र असुन सगळ्याच इच्छुकांनी एकत्रीत आपल्या वार्डात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.
आता पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ४२ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.मतमोजणी अप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये होणार आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नानासाहेब आगळे सहायक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विवेक धांडे हे आहे.
