नाशिक येथे संपन्न झालेल्या एका भव्य कार्यक्रमात जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांना शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय “शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला नाशिक शहराच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर प्रमुख उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय न्यायमूर्ती वसंतराव शिवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वीरपत्नी हर्षदा खैरनार, हेमंत धात्रक नामको बँकेचे चेअरमन
आप्पासाहेब संतोष मराठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जितेंद्र पाटील यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
