मुंबई, एप्रिल २०२६: भारतातील विश्वासार्ह पादत्राणे ब्रँड पॅरागॉन फुटवेअर यांनी महिलां उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला ग्राहकांना खरेदीस प्रोत्साहन देणे आणि आधुनिक, फॅशनप्रधान डिझाइन्स अधिक सुलभ करणे हा आहे.
या ऑफरअंतर्गत ग्राहकांना सुलभ क्यूआर-आधारित प्रक्रियेद्वारे हमखास रु. ३० तत्काळ कॅशबॅक मिळणार आहे. प्रत्येक उत्पादनाच्या टॅगवर स्क्रॅच-सक्षम क्यूआर कोड दिलेला आहे. हा कोड स्कॅन करून कॅशबॅक पृष्ठावर जाता येते. व्हाउचर कोड आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर ग्राहक सहजपणे कॅशबॅक मिळवू शकतात. यामुळे खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि मूल्यवर्धित होतो.
पॅरागॉनची महिला उत्पाद श्रेणी हा आधुनिक ट्रेंडनुसार आणि आकर्षक डिझाइन्सवर
आधारित आहे. आजच्या महिला ग्राहकांना केवळ आरामदायक आणि टिकाऊ पादत्राणेच नव्हे, तर विविधता, शैली आणि सध्याच्या फॅशनशी सुसंगतता देखील अपेक्षित असते. या उपक्रमाद्वारे पॅरागॉन आपल्या महिला उत्पाद श्रेणी अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या एकूण विक्रीत १५–२० टक्के योगदान देणाऱ्या या विभागाचा वाटा पुढील तीन वर्षांत ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे या विभागात कंपनीचा वाढता भर अधोरेखित होतो.
या उपक्रमाबाबत बोलताना, पॅरागॉन फुटवेअरचे मार्केटिंग आणि आयटी विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले, “महिला उत्पाद श्रेणी हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शैली, आराम आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्तता यांचा समतोल साधणारी उत्पादने देण्यावर आम्ही भर देत आहोत. कॅशबॅक उपक्रमाद्वारे अधिकाधिक ग्राहकांना आमच्या आधुनिक आणि विविध प्रकारच्या पादत्राणांचा अनुभव घेण्यास प्रोत्साहन मिळेल. विविध बाजारपेठांतील महिलांसाठी फॅशनप्रधान पादत्राणे अधिक सुलभ करण्यावर आमचा सातत्याने भर राहील.”*
विविध प्रकारच्या उत्पादनांनी सजलेल्या पोर्टफोलिओसह पॅरागॉन ग्राहकांच्या गरजेनुसार उपयुक्त डिझाइन, दैनंदिन आराम आणि विश्वासार्ह गुणवत्ता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात महिला उत्पाद श्रेणी हा कंपनीच्या उत्पन्नवाढीसह ब्रँडच्या नव्या प्रतिमेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
