जे बी एन महाराष्ट्र न्यूज | जामनेर
प्रतिनिधी : सुपडू जाधव
जामनेर : शहरातील शास्त्रीनगर भागात श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराच्या चौथ्या वर्षी तब्बल १०९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच सामाजिक भावनेतून यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेडप्लस ब्लड सेंटर फाउंडेशन यांच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानातून जीवन वाचविण्यास हातभार लागावा, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. भक्त परिवारातील कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, एकनाथ मिस्तरी, संजय महाजन, राहुल भाऊ चव्हाण, विकास पाटील, ईश्वर प्रल्हाद चवरे, शंकर सातवे, भैय्या परिट, माधव चव्हाण, कैलास पालवे, नाना सातवे, महेंद्र बाविस्कर (मा. उपनगराध्यक्ष), दिलीप खोडपे सर (मा. जिल्हा परिषद सदस्य), बाबुराव हिवराळे (नगरसेवक), चंद्रकांत शिंदे (नगरसेवक), पप्पू भाऊ पाटील, सचिन बोरसे, प्रदीप गायके, रविंद्र बंडे, नामदेव पालवे, डॉ. विनोद भोई, जगदीश बैरागी, संतोष सोनवणे, संजय पालवे, गोकुळ साळुंके, युवराज माळी, जयवंत पर्वते, विकास माळी, आकाश साळुंखे यांच्यासह गजानन महाराज भक्त परिवारातील नागरिक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. भक्तीबरोबरच समाजसेवेची परंपरा जपणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

