JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक श्री मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा.
JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर 9 वर्ष पूर्ण 10 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले आहे. यावेळी कार्यालयात संचालक श्री मनोजजी कावडिया यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्री मनोज कावडिया त्यांनी चॅनेल बाबत कौतुक करीत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.यानंतर केक काटत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला संचालक श्री किरण सोनवणे,संपादक शांताराम जाधव,कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया,अँकर मीनल चौधरी,कॅमेरामन विलास ढाकरे,सुपडू जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे,आबा पाटील,यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
