JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यशस्वी 9 वर्ष पूर्ण.संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने यशस्वी ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने संचालक मनोजजी कावडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी मनोज कावडिया यांनी चॅनेलच्या यशस्वी वाटचालीबद्दल विशेष कौतुक करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून वर्धापनदिनाचा आनंद साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला संचालक किरण सोनवणे, संपादक शांताराम जाधव, कार्यकारी संपादक ईश्वर चोरडिया, अँकर मीनल चौधरी, कॅमेरामन विलास ढाकरे, सुपडू जाधव, सुनील जाधव,सचिन माळी, प्रविण गावंडे, आबा पाटील आणि इतर सहकारी उपस्थित होते.

JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून, निष्पक्ष आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनेलची ओळख आहे.

error: Don't Try To Copy !!