सावळदबारा सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड ; बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोष

*सावळदबारा सरपंचपदी आमदार अब्दुल सत्तार समर्थकांची वर्णी मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड ; बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने करण्यात आला जल्लोष
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
सोयगाव ( प्रतिनिधी ) जब्बार तडवी

तालुक्यातील अत्यंत महत्वाचे समजल्या जाणाऱ्या सावळतबारा गावच्या सरपंच पदी आमदार अब्दुल सत्तार समर्थक मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने गावात जल्लोष करण्यात आला.

   आज दिनांक 1 एप्रिल 2025 वार मंगळवार रोजी सावळदबारा ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड प्रक्रिया होती. सकाळी दहा ते बारा पर्यंत उमेदवारी अर्ज भरणे , बारा ते एक पर्यंत छाननी, एक ते दोन पर्यंत माघार व दुपारी दोन वाजता सरपंच पदासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच पदासाठी  मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले . यामध्ये दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना  विजय घोषित करण्यात आले.

  या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच शिवगंगा शिवाप्पा चोपडे मोहन सुरडकर, संदीप सूर्यवंशी, सैनाज तडवी,  तायराबी शेख हे उपस्थित होते.

मोहम्मद आरिफ मोहम्मद लुकमान यांची सरपंच पदी निवड होताच बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी सिल्लोड बाजार समितीचे उपसभापती दारासिंग चव्हाण,माजी सरपंच लोकमान शेठ ,बाजार समितीचे माजी सभापती शिवाप्पा चोपडे , माझी सभापती धर्मसिंग चव्हाण माजी सभापती सांडूभाऊ तडवी , माजी सरपंच मैताप तडवी , मा.चेअरमन पंजाबराव देशमुख , माजी सरपंच मोहम्मद फिरोज ,मोहम्मद लुखमान, माजी उपसरपंच वसंता चोरमले निलेश आप्पा चोपडे ,अशोक देशमुख , फिरोज खा शेख गफार, अमजद तडवी ,अनिल पाटील , संजय देशमुख, गजानन चोपडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don't Try To Copy !!