गुढीपाडव्याचे औचित्य साधत जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी श्री.शशिकांत त्रंबक पाटील यांनी वाटसरूंसाठी केली पाणपोईची सुविधा

गुढीपाडव्याचे औचित्य साधत जामनेर तालुक्यातील पाळधी येथील शेतकरी श्री.शशिकांत त्रंबक पाटील यांनी वाटसरूंसाठी केली पाणपोईची सुविधा.

कडक उन्हामध्ये रस्त्याने येणारे जाणारे वाटसरू,तसेच शेतकरी यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून मागील 14 वर्षापासून पाळधी खर्चाना रस्त्यावर दर गुढीपाडव्याला पूजन करून लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा अखंडित नित्यक्रम शेतकरी शशिकांत पाटील यांनी सुरू ठेवला आहे.

जामनेर तालुक्यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या माध्यमातून मानवतेसाठी काम करणारे असे अनेक लोक आहेत.

“पाणी हेच जीवन आहे” पाण्याचे महत्व समजून त्यासाठी जीवन वाहून घेतलेल्या शशिकांत भाऊंना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

error: Don't Try To Copy !!