श्रावण सोमवारी सर्पराजाचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात दर्शन, पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी यांच्याकडून जीवदान.

पहूर (ता. जामनेर) :
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी पहूर येथील देवळी आणि गोगडी नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात एका अनोख्या प्रसंगाचे साक्षीदार भाविक झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात सर्पराजाने दर्शन दिले .
सायंकाळी पूजा-अर्चेच्या वेळी मंदिरात अचानक सात ते आठ फूट लांबीचा साप दिसून आला. तात्काळ या घटनेची माहिती पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येत अत्यंत शिताफीने व काळजीपूर्वक सापाला पकडले. त्यांनी सांगितले की हा साप धामण जातीचा बिनविषारी असून तो मानवाला धोका पोहोचवत नाही.
सर्पराजाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या साहसी व पर्यावरणपूरक कार्याबद्दल श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे,बाबुराव घोगडे यांनी सर्पमित्र नाना माळी व त्यांचे सहकारी प्रा.ईश्वर चोरडिया यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या कार्याची उपस्थित भाविकांनी स्तुती केली.
सर्प व पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

error: Don't Try To Copy !!