
शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
शेंदुर्णी येथील अबिद हुसेन शेख याने तो ज्या शाळेच्या बसवर चालक होता त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असुन याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक मोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला.या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.हजारोच्या संख्येने हिंदु बांधव आरोपी यास फाशी झाली पाहिजे,लव्ह जिहाद बाबत फलक घेऊन मुक मोर्चात यात सहभागी झाले होते.

यावेळी प्रखर वक्ते बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी आपल्या घणाघाती भाषणात लव्ह जिहाद,हिंदु मुलींवर कसं जाळं फेकले जाते, त्यांना हळूहळू कसं अटकवलं जाते,मग मैत्री प्रेमाचं नाटक व नंतर लग्नाच्या साठी ब्लॅक मेल करुन धर्मांतर केले जाते यासाठी मोठं षडयंत्र असुन हिंदुंनी जागृत रहावे.मुलींना दुर्गा वाहीनीत तर मुलांना संघाच्या शाखेत पाठवावे आपण आपल्या धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आरोपी व त्यांच्या सर्व साधीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी यासाठी जागृत राहुन ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी उत्फुर्तपणे महिलांच्या वतीने सौ.लिना मनोज चव्हाण यांनी जोषपुर्ण भाषण केले व महिला मुलींना मार्गदर्शन केले.

सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले व निवेदनाच्या मागण्या वाचुन दाखवल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले.

मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड,पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल असं आश्वासन दिले.
यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले
