जामनेर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, वार्ड क्रमांक 12-ब (सर्वसाधारण महिला राखीव) या प्रभागातून सौ. स्वामिनी जगदीश भामरे (सोनार) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षातर्फे हा अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. सौ. भामरे यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात भाजपकडून निवडणुकीची अधिकृत तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्ज दाखल करताना त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. सौ. स्वामिनी भामरे या जगदीश बाबुराव भामरे यांच्या अर्धांगिनी असून सामाजिक क्षेत्रात त्यांच्या सक्रिय योगदानामुळे त्या परिसरात परिचित आहेत.
नगरपरिषद निवडणुकीची राजकीय तापटता दिवसेंदिवस वाढत असताना, वार्ड 12-ब मधील या उमेदवारीमुळे मुकाबला अधिक चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
