जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर डांगी फॉर्मजवळ आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात जीवन जगन्नाथ चव्हाण (जोगी), वय २५, रा. भागदारा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. होंडा लिओ मोटरसायकल व रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन चव्हाण हे व्यवसायाने सेंटिंग कामगार होते. त्यांचे आई-वडील दोघेही हयात नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, ४ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी असा कुटुंबाचा आधार असलेली दोन लहान मुले आहेत. अचानकच आलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धडकेत डोक्याला गंभीर मार बसल्याने जीवन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विवाहित असून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक नागरिकांकडून शासनाने या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.
या अपघातामुळे भागदारा परिसरात शोककळा पसरली आहे.
भागदारा येथील २५ वर्षीय तरुणाचा अपघात जागीच मूत्यू….
