शेंदुर्णीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल ६११ मतांनी विजयी…महा विकास आघाडीने दिली जोरदार लढत,…

शेंदुर्णी ( ता.जामनेर ) शेंदुर्णी नगरपंचायती साठी झालेल्या निवडणुकीच्या आजच्या निकालात भाजपने हॅड्रीक करत सलग तिसऱ्यांदा आपली एकहाती सत्ता स्थापन केली असुन महाविकास आघाडीने सुद्धा जोरदार लढत दिली .
भाजपा चे अधिकृत ८ नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ४, इंदिरा कॉंग्रेस चे २ तर अपक्ष ३ नगर सेवक विजयी झालेअसून यामध्ये१ नगरसेवक भाजप पुरस्कृत तर १ नगरसेवक आधीच बिनविरोध झाला असून त्यांनी भाजपाला पाठींबा दिला आहे.


शेंदुर्णी नगरपंचायत मध्ये २०४५३ एकुण मतदान होते यापैकी १४२९३ म्हणजे ६९.८८ टक्के मतदान झाले होते.नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल व महाविकास आघाडीच्या वतीने सौ.उज्वला काशिद यांच्या मध्ये थेट झाली.२ अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात होते.
नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार गोविंदअग्रवाल यांना ७१७० तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.उज्वला काशिद यांना ६५५९ मते मिळाली असुन गोविंद अग्रवाल हे ६११ मतांनी विजयी झाले आहेत.सलग तिसऱ्या वेळी जनतेने भाजपच्या ताब्यात नगरपंचायत दिली आहे एक वेळ ग्रामपंचायत व आता सलग दुसऱ्यांदा नगरपंचायत मध्ये भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवलीआहे.

वार्ड क्र.१.
भिसे नितीन रामदास.. (अपक्ष)… ३३७ मते

वार्ड क्र.२…
निकम उज्वल देविदास,.. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कॉंग्रेस..३६१ मते

वार्ड. क्र.३.
सय्यद कलीम सलीम.. राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) कॉंग्रेस… २०७ मते

वार्ड. क्र. ४.
धनगर जागृती श्रीराम.. राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार)३४६ मते

वार्ड क्र.५
तांबोळी मिनाजबी तैसिफ. अपक्ष(भाजपा पुरस्कत )५७४ मते

वार्ड क्र.६
पाटील प्रियंका अभिजीत ( भाजपा )
३७२ मते

वार्ड. क्र.७
जैन धिरज रमेश. (भाजपा)
४३४ मते

वार्ड क्र.८
चौधरी कल्पनाबाई रमेश
अपक्ष… बिनविरोध

वार्ड.९.
बारी मनिषा शैलेश..( भाजपा)
३८६ मते

वार्ड. क्र. १०
पाटील बेबी तुकाराम ( भाजपा )
३०७ मते

वार्ड क्र ११
बारी सुनिल रतन.. (भाजपा )
५९९ मते

वार्ड क्र १ २
गरुड अश्विनी प्रविण..राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार ) कॉंग्रेस..५७५ मते

वार्ड क्र. १३
गरुड अंबरिश काशिनाथ ( क्रॉग्रेस )३३३ मते

वार्ड क्र. १४
शेख उजमा शरीफोद्दीन.. कॉंग्रेस
७३५ मते

वार्ड. क्र १५
भिल जया सुनिल.. भाजपा
५५१ मते

वार्ड क्र.१६
बारी शरद बाबूराव…..भाजपा
५०१ मते

: वार्ड.१७
बारी अतुल प्रल्हाद..
भाजपा ४२५ मते

यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी बोदवड येथील तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळ व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी व प्रशासक विवेक धांडे यांनी काम बघीतले यावेळी पहुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे तसेच पोलिस बांधव, नगरपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.
error: Don't Try To Copy !!