जामनेर – प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून तो त्याच्या कर्तृत्वासाठी श्रेष्ठच आहे.मग तो पुरुष असो व स्त्री.उलट काही बाबतीत स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत.असंख्य क्षेत्रात महिला आज प्रतिनिधित्व करीत आहेत.त्याच बरोबरीने महिलांसाठीचे अधिकार त्यांचे कायदे हे देखील त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे.आज महिलांवरील अत्याचारांच प्रमाण वाढलेलं आहे,तुम्ही शिक्षणाबरोबर स्वतःच्या संरक्षणासाठी स्वयंसिद्ध प्रशिक्षण घ्या.कोणत्याही नात्यात येतांना स्वतःवर असलेल्या जबाबदारी चं भान ठेवा.आणि तिच्या नकार हा कायम नाहीच असतो,

नकाराला होकार समजू नका.जी.एम.नर्सिंग इन्स्टिट्यूट,जामनेर तर्फे महीला दिनानिमित्त विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी जामनेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय,जामनेर येथील अधिवक्ता आणि युवा व्याख्याता अँड.शुभांगी विठ्ठल फासे या प्रमुख वक्त्या तसेच अँड.आदित्य देशमुख हे देखिल या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर अॅड.फासे यांनी विद्यार्थ्यांना महीला सक्षमीकरण आणि सामाजिक जीवन
मूल्य,कायदेशीर जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर अत्यंत प्रभावी व समजण्यास सोपी अशी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला.तसेच अॅड.देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना लहान बालकांसंबंधीचे कायदे (पॉक्सो कायदा) वर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.अश्विनी चौधरी यांनी वक्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरी जाणीवा व मानवी मूल्यांची दृढ पायाभरणी होत असल्याचे सांगितले.
