जैन इंटरनॅशनल स्कूल जामनेर
दि. 17/04/2026
गेल्या बारा वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम
सी.बी.एस.ई. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जामनेर येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा जपत शाळेने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या वर्षीच्या निकालात नीरज किरण पाटील याने 96.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे पार्थ गायकवाड (93.60%), अर्जुन फुसे (92.40%), कुणाल सावकारे
(92.20%), प्रज्ञेश सुरवाडे (91.80%), अनुष्का थोरात (90.80%), दीपेश बनकर (90.40%), राज साबळे (90.20%), ओम पाटील (90%), अक्षरा पाटील (90%) आणि अर्थव पाटील (90%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच पालकांच्या सहकार्यामुळे हा यशस्वी निकाल लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
