जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर (वा.) – 40 वर्षापूर्वी स्थापित भारतीय जैन संघटना गेल्या चार वर्षापासून आपल्यात परिवर्तन करण्यासाठी संस्थापक शांतीलाल मुथा व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन प्रयत्नशील आहे. या साठी बारा महिन्यात 14 फोंडेशन कार्यक्रम दिलेत. त्याचाच एक भाग म्हणून भ्रमण हा कार्यक्रम असून राज्य अध्यक्ष केतन शाह व राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांसाठी गोवा येथे आयोजित केला होता.चार दिवशीय भ्रमण या कार्यक्रमात राज्यातील बारा विभागांपैकी सात विभागातील 18 जिल्ह्यातील एकूण 150 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.यात खानदेशातून 29 पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
कार्यक्रमाच्या पाहिल्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करवून घेतला. या प्रसंगी राज्य अध्यक्ष केतन भाई म्हणाले, या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्याचा आपसात व्यापार उद्यम वाढेल,आपसात प्रेम,स्नेह बरोबरच नात्यात रूपांतर होऊ शकेल व जे नविन कार्यकर्ते आले आहेत त्यांना बीजेएसचा 40 वर्षाचा इतिहास कळेल. यावेळी मंचावर राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव विजय दुगड,खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी मनोगत तर सूत्रसंचालन राज्य कार्यकारणी सदस्य संतोष बम्ब यांनी केले.जामनेर येथून खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,महिला सदस्य स्नेहल मुनोत,मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया,आदि सदस्य गोवा भ्रमण साठी गेले होते.दुसऱ्या दिवशी बालाजी,मंगेशी मंदिर, ओल्ड गोवा चर्च, डोना पोला, कृज वरून परत आलो. तिसऱ्या दिवशी जैन मंदिर, डॉल्फिन पॉईंट, आगुदा फोर्ट, बागा ब्रीज करून रात्री हौजी गेम मध्ये सर्वांनी सहभाग घेतला.चौथ्या दिवशी समापनला बीजेएसच्या मॅनेजिंग डायरेक्टर कोमल, गोवा राज्य अध्यक्ष भरत पाटील, राज्य सचिव राजू देवरकर यांची उपस्थिती लाभली.यावेळी कोमल जैन म्हणाल्या, बीजेएस ही केवळ संघटना नसून एक परिवार आहे.परिवाराच्या समस्या लक्षात घेऊन, त्याचा खोलवर अभ्यास करून उपाय शोधून त्यावर अंमलबजावणी केली जाते.12 राज्यात 50 हजार कार्यकर्ते या साठी सज्ज आहेत. पती पत्नीच्या संबंधातील वाद सोडण्यासाठी पारिवारिक अदालत, परिणय पथ, दिल का जिकशा स्मार्ट गर्ल्स, कपल डेव्हलपमेंट असे कार्यक्रम नवीन रूपात आले, याच बरोबर पाणी, नैसर्गिक आपत्ती, शिक्षण यात ही संघटना कार्यरत आहे. पूर्ण चार दिवस शाकाहारी भोजन, राहण्याची उत्तम व्यवस्था राज्याध्यक्ष केतन शाह, प्रवीण पारख यांनी केली. रविवारी ता.31रोजी सर्वांनी आपसात जड अंतःकरणाने निरोप दिला.
गोव्यात महाराष्ट्रातील 150 कार्यकर्त्यांचा सहभाग,बीजेएसचा भ्रमण कार्यक्रम संपन्न
