पाळधी जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू झालेल्या 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी मोफत मार्गदर्शिकांचे वाटप.

पाळधी ता. जामनेर : जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी येथे आज दिनांक २५ जून २०२६ रोजी इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ४०० रुपये किमतीची नवोदय मार्गदर्शिका मोफत वितरित करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची योग्य तयारी करता यावी, या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
मार्गदर्शिकेमुळे विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास अधिक सोपा व प्रभावी पद्धतीने करता येणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत मनापासून आभार मानले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा नेहमीच अशा शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
“गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी सदैव कटिबद्ध!” 📖✨
