पाळधी : इंग्रजी भाषेचे ज्ञान, शब्दसंपदा व अचूक शब्दलेखन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने समूह साधन केंद्र, पाळधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी जि. प. केंद्र शाळा, पाळधी येथे झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेत विविध गटांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले इंग्रजी शब्दलेखन कौशल्य दाखवून दिले.
स्पर्धेतील गटनिहाय विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे—
गट क्र. १
🥇 देवांश निलेश धनगर — जि. प. शाळा, सुनसगाव खुर्द
🥈 कृष्णा अमोल पाटील — जि. प. शाळा, सोनाळे
गट क्र. २
🥇 संस्कृती समाधान पाटील — जि. प. शाळा, माळपिंप्री
🥈 वंशराज समाधान धनगर — जि. प. शाळा, सुनसगाव खुर्द
गट क्र. ३
🥇 ऐश्वर्या दीपक पाटील — जि. प. शाळा, सोनाळे
🥈 मंगेश कृष्णा लांडगे — जि. प. शाळा, माळपिंप्री
गट क्र. ४
🥇 हर्षदा विशालसिंग पाटील — जि. प. शाळा, देवपिंप्री
🥈 प्रगती संजय तिरमली — जि. प. शाळा, माळपिंप्री
या स्पर्धेसाठी श्री. मुरलीधर बोंडे, श्री. मानसिंग परदेशी, श्री. किरण सपकाळे आणि श्री. संदीप सोनार यांनी स्पर्धा परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख श्री. बाबुराव धुंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. इंग्रजी भाषेच्या सबलीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपले भाषिक कौशल्य सादर करण्याची प्रभावी संधी मिळाली.
विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, आता हे विजेते स्पर्धक तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतील. त्यांच्या यशाबद्दल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.









