जंगीपुराच्या डॉ. सरिता राजपूत यांची MPSC मार्फत सहाय्यक संचालकपदी निवड

पुरातत्त्व विभागात उल्लेखनीय यश; शेंदुर्णी परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

जंगीपुरा, ता. जामनेर :

जंगीपुरा येथील डॉ. सरिता बाबूलाल राजपूत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागात सहाय्यक संचालक या पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे जंगीपुरा तसेच शेंदुर्णी परिसराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. सरिता राजपूत यांचे पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण गरुड महाविद्यालयात, तर बारावीपर्यंतचे शिक्षण गरुड विद्यालयात झाले आहे. स्थानिक शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवलेले हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

डॉ. सरिता राजपूत या जंगीपुरा येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर राजपूत यांच्या भगिनी आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या डॉ. राजपूत यांनी मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या पदापर्यंत मजल मारली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल जंगीपुरा, शेंदुर्णी तसेच परिसरातील नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

error: Don't Try To Copy !!