फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल; तपास सुरू
यावल : तालुक्यातील यावल-भुसावळ मार्गावर पोद्दार शाळेसमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडखेल, ता. जामनेर येथील रहिवासी दुचाकीस्वार मोटरसायकल क्रमांक एमएच १९ आर ७७०२ घेऊन जात असताना समोरून निमखेडी, ता. यावल येथील सुरेश कोळी हे मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सीजी ०४३३ घेऊन येत होते. यावल-भुसावळ रोडवरील पोद्दार शाळेसमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात संबंधित दुचाकीस्वारांना दुखापत झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
याप्रकरणी विक्रम बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सीजी ०४३३ वरील चालक सुरेश कोळी यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे करीत आहेत.
