जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चेतना पाटीलची दमदार कामगिरी

इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या विद्यार्थिनीची नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड

जामनेर, दि. ४ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३ व ४ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल येथे या स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. चेतना निलेश पाटील हिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करत चतुर्थ क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची शालेय नाशिक विभागीयस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नाशिक विभागीयस्तरीय स्पर्धा दि. ५ ऑक्टोबर रोजी बिटको कॉलेज, नाशिक येथे होणार असून, या स्पर्धेसाठी चेतना पाटीलचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

यावेळी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे राष्ट्रीय ऑर्बिटर प्रवीण ठाकरे तसेच ऑर्बिटर अभिषेक जाधव यांनी चेतना पाटील हिला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार आदी उपस्थित होते.

चेतना पाटीलच्या या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र भाऊ महाजन, सचिव श्री. किशोर भाऊ महाजन, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. एस. आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक श्री. एस. एन. चवरे, उपप्राचार्य प्रा. डी. झेड. गायकवाड, पर्यवेक्षक श्री. जी. जी. अत्तरदे व श्री. व्ही. बी. पाटील यांनी तिचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशासाठी क्रीडा विभाग प्रमुख श्री. जी. सी. पाटील, श्री. बी. पी. बेनाडे, श्री. गजानन कचरे तसेच क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Don't Try To Copy !!