इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचा सुमित चिंचोले यांस विभागीयस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत कांस्य पदक

दि.१९/१०/२०२४
जामनेर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुले शालेय विभागीयस्तरीय शासकीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा आज दि.१९ रोजी नाशिक विभागीय क्रीडा संकुल,हिरावडी रोड, नाशिक येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमित संजय चिंचोले (इयत्ता १२ वी विज्ञान ) याने ११० मीटर अडथळा शर्यत तृतीय क्रमांक प्राप्त करत १९.०१ सेकंद वेळ राखत कांस्यपदक नाशिक क्रीडा अधिकारी बी आर जाधव यांच्या हस्ते देण्यात आले सोबत इंदिराबाई ललवाणी माध्य. व उच्च माध्य विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार होते.
स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक मनपा, ग्रामीण एकूण १३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
◼️ अभिनंदन: इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ महाजन, सचिव किशोर भाऊ महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, बी पी बेनाडे, जी डी कचरे यांनी केले.
◼️मार्गदर्शन: क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे लाभले.

error: Don't Try To Copy !!