डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न

जामनेर (प्रतिनिधी- सुपडू जाधव) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सवानिमित्त सम्राट अशोक नगर येथील त्रिरत्न बुद्ध विहारात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत उत्सव समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बैठकीत राहुल लक्ष्मण साबळे यांची अध्यक्ष, तुषार प्रकाश मेहेरे यांची उपाध्यक्ष, रोहित संजय दांडगे यांची सचिव, अमोल राजू सोनवणे यांची खजिनदार, तर आनंद ईश्वरलाल सुरडकर यांची सह-खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय अजय बाविस्कर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

समिती सदस्य म्हणून कल्पेश सोनवणे, आदित्य भिमडे, रोशन पाटील, वैभव सुरवाडे, विशाल अहिरे, श्रींकांत शेंडे, आदित्य सपकाळे, वैभव नन्नवरे, अतुल वाघ आणि शुभम सुरवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीत जयंती उत्सवाच्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली असून, भविष्यातील नियोजनासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे.

error: Don't Try To Copy !!