जालना येथील प्रा. डॉ. भगवानसिंग डोभाळ यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील लोकमत ग्लोबल अवॉर्ड प्रदान.

लोकमत समूहाच्या वतीने दरवर्षी राजकीय,शैक्षणिक, सामाजिक, कला,क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.2024 — 2025 यावर्षीचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती म्हणून जालना येथील प्रा.डॉ.भगवानसिंग डोभाळ यांना लोकमत ग्लोबल अवॉर्ड जाहीर करण्यात आला होता.

दिनांक 17 मार्च 2025 वार सोमवार रोजी मकाओ हाँगकाँग येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्या हस्ते प्रा.डॉ. भगवानसिंग डोभाळ यांना लोकमत ग्लोबल अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

प्रा. डॉ.भगवानसिंग डोभाळ यांना मिळालेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अवॉर्ड बाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
error: Don't Try To Copy !!