नाशिक –नाशिक येथे सन २०२७ मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळा या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज नाशिकमधील विविध धार्मिक स्थळांना भेट दिली.
या भेटीदरम्यान रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा, गोदाघाट, दशक पंचक, नाशिकरोड रेल्वे स्टेशन आणि तपोवन आदी ठिकाणी पाहणी करून महाकुंभमेळ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. महाकुंभमेळा २०२७ हा सुरक्षित, सुव्यवस्थित व भव्यदिव्य व्हावा यासाठी नियोजनबद्ध तयारीला सुरुवात झाली आहे. कुंभमेळा हा नाशिकच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असून, भाविकांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
याप्रसंगी आ. सौ. देवयानी फरांदे, आ. सौ. सीमा हिरे, जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा, महापालिका आयुक्त सौ. मनीषा खत्री, पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.