छत्रपती शिवाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्ष पदी अमोल ठोंबरे.तर उपाध्यक्षपदी प्रविण गावंडे.

जामनेर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून अमोल ठोंबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण गावंडे यांची निवड करण्यात आली.त्यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी जामनेर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी तालुका कार्यकारणी बैठकिला संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ.धनंजय बेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , नितीन पाटील, l नारायण महाजन, प्रमोद पाटील, कैलास बडगुजर , शरद मोरे, दीपक बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Don't Try To Copy !!