तालुका क्रीडा नियोजन बैठक ठरली फलदायी; प्रा. समीर घोडेस्वार, ऋग्वेद पेडगांवकर व कार्तिकी लामखेडे यांचा सन्मान

जामनेर, ता.१६ जुलै:
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी सहविचार सभा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ११ वा. पंचायत समिती, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी संजय पाटील, स्पर्धा समिती सचिव जी.सी. पाटील, मुख्याध्यापक शेख जलाल, गटसाधन केंद्र समन्वयक पंकज रानोटकर यांसह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी डॉ. आसिफ खान यांनी चालू शैक्षणिक वर्षातील विविध क्रीडा योजना, क्रीडा शिक्षकांच्या योगदानाचे सन्मान, ‘लाईफटाईम अचीवमेंट’ पुरस्कार, व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांचा गौरव अशा महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय तालुक्यातील १० प्रमुख खेळांची नियोजनपूर्वक आखणी व शालेय पत्रिकेविषयी चर्चा झाली.

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘माझी शाळा – सुंदर पटांगण’ ही अभिनव संकल्पना मांडून, शाळांमध्ये खेळांच्या अद्ययावत सुविधा व उत्स्फूर्त सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले.

या प्रसंगी विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद पेडगावकर यांचे चिरंजीव ऋग्वेद यांनी इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तर वाकी बुद्रुक येथील सरपंच व क्रीडा शिक्षक ललित लामखडे यांच्या कन्या कार्तिकी हिने इ.१० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले.

तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांना जिल्हास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सभेचे सूत्रसंचालन डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.
या बैठकीस तालुक्यातील ७२ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या यशस्वीतेसाठी डी के चौधरी, नरेंद्र पाटील, व्ही एन पाटील, आनंद मोरे, पी डी पाटील, शाहिद शेख जहीर खान, देवा पाटील आदी.परिश्रम घेतले.

error: Don't Try To Copy !!