नि.पं.पाटील विद्यालय पळासखेडे (मि)शाळेत वृक्षारोपण

आज दि २५ जुलै २०२५ रोजी पळासखेडा( मिराचे) तालुका जामनेर येथील नि पं. पाटील विद्यालयात वृक्षारोपण संपन्न झाले.श्रावण मासारंभ चे औचित्य साधून आज विद्यालयात धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे संचालक व स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन बापूसाहेब श्री. भीमराव पाटील यांच्या हस्ते व त्याचबरोबर विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री. डी .पी .पाटील सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पवार बाबा यांचे हस्ते ५० मोठ्या रोपांची लागवड करण्यात आली.

मे महिन्याच्या वादळात विद्यालयातील उन्मळून पडलेल्या वृक्षांच्या जागेवर पुन्हा जेसीबीने मोठे खड्डे तयार करून तिथे रोपांची लागवड करण्यात आली.रोपांची लागवड केल्यावर त्या खड्ड्यांमध्ये शेणखत मिश्रित काळी माती टाकण्यात आली.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी प्रत्येकी एक व त्यापेक्षा जास्त रोपांसाठी आर्थिक योगदान दिले.त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून एक शिक्षक, शिक्षिका व चार विद्यार्थी त्या रोपांचे जतन व संवर्धन करतील त्या अनुषंगाने प्रत्येक टीमला एक रोप दत्तक घेण्यात आले.


विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही.आर.पाटील सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.जे.आर. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

error: Don't Try To Copy !!