प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील गजानन कानळजे ‘रा. मोयखेडा दिगर यांची 15 वर्षाची मुलगी आजारी असल्याने रुबी हॉस्पिटल येथे उपचार घेत होती उपचारादरम्यान तिला अर्जंट दुर्मिळ हे AB- निगेटिव्ह रक्तगट असलेला प्लेटलेटची गरज होती परंतु संपूर्ण जळगाव मधील ब्लड बँक शोधून सुद्धा ब्लड मिळत नव्हती तेव्हा मात्र संपूर्ण परिवार हताश होऊन मुलीच्या वडिलांच्या व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आले आणि नातेवाईकांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून शोध सुरू केला एबी निगेटिव्ह रक्तगटाचा नातेवाईकांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये रक्तदाता हवाय असा मेसेज व्हायरल केला.
जामनेर शहरातील एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये अर्जंट एबी निगेटिव्ह रक्तदाता हवाय असा मेसेज पाळधी येथील तरुण पंकज धनगर याने बघितला कोणताही क्षणाचा विलंब न करता
त्या मुलीच्या वडिलांना कॉल करून विचारणा केली असता त्या
मुलीचे वडील ढसाढसा रडायला लागले व माझ्या मुलीला वाचवा असे विनवणी करू लागले तेव्हा
पंकज धनगर तात्काळ जळगाव येथील रेड क्रॉस ब्लड बँकेत जाऊन पंकज धनगर यांनी आपले अमूल्य रक्तदान करून त्या मुलीचे प्राण वाचवले.यावेळी कमलाकर पाटील,नितीन धनगर,सर्व रेडक्रॉस ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते.
पंकज हा देवदूत म्हणून वेळेवर आला व मुलीचा जीव वाचवला या मदतीवरून माणुसकीवरचा विश्वास अजून दृढ झाला असेच म्हणावे लागेल.
त्या मुलीला अजून पाच AB- निगेटिव्ह रक्तगट असलेला रक्तदाता हवाय कुणी एबी निगेटिव्ह रक्तदाता असेल त्यांनी डॉ देवानंद सरताळे 8975661500 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
