विटनेर (ता.जळगांव ) – गावाचे सुपुत्र स्वर्गीय ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ विटनेर येथे उभारण्यात आलेल्या एक्वा पाणपोईचे लोकार्पण मा. ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते संपन्न झाले.
गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. स्व. ललितदादा साठे यांनी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांत दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक केली.
कार्यक्रमास मा. श्री. पप्पूदादा सोनवणे (जि.प. सदस्य), मा. श्री. हरीशेठ साठे (माजी पं. स. सभापती), मा. श्री. साहेबरावदादा वराडे (माजी पं.स. सदस्य), नेहाताई ललित साठे (लोकनियुक्त सरपंच, विटनेर), मा. श्री. रमेशआप्पा पाटील, मा. श्री. शिवराज पाटील, मा. श्री. पी. के. पाटील तसेच गावातील व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. ललितदादा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
विटनेर येथे स्व. ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ एक्वा पाणपोईचे लोकार्पण
