ऋषीपंचमीनिमित्त अंबिलहोळ येथे प्रकाश पाटील यांचा शेतकऱ्यांशी संवाद

अंबिलहोळ : प्रतिनिधी

ऋषीपंचमीनिमित्त अंबिलहोळ येथील केशव बाबा व रामदेव बाबा यांच्या धार्मिक स्थळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी भंडाऱ्यासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली.

यानंतर प्रकाश पाटील यांनी केशव बाबा व रामदेव बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच अंबिलहोळ ग्रामस्थ आणि पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची भेट घेऊन विविध स्थानिक विषयांवर चर्चा केली.

याप्रसंगी जितेंद्र नाईक (खडकी), दौलत पवार, गोकुळ चव्हाण, रामचंद्र नाईक, विजय चव्हाण, भानुदास चव्हाण यांच्यासह अंबिलहोळ येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Don't Try To Copy !!