Maharashtra
छत्रपती शिवाजी ब्रिगेड जामनेर तालुकाध्यक्ष पदी अमोल ठोंबरे.तर उपाध्यक्षपदी प्रविण गावंडे.
जामनेर (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत जामनेर तालुकाध्यक्ष म्हणून अमोल ठोंबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून प्रविण गावंडे यांची निवड करण्यात आली.त्यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी जामनेर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी तालुका कार्यकारणी बैठकिला संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, डॉ.धनंजय बेंद्रे,जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील , सामाजिक कार्यकर्ते अरुण पाटील , नितीन पाटील, l नारायण महाजन, प्रमोद पाटील, कैलास बडगुजर , शरद मोरे, दीपक बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापकाचा लाचखोरीचा प्रयत्न उधळला; लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकावर दुसऱ्यांदा कारवाई
निपाणे (ता. एरंडोल), जि. जळगाव | प्रतिनिधी संत हरिहर माध्यमिक विद्यालय, निपाणे येथील मुख्याध्यापकाने शाळेतील शिपायाकडून वैद्यकीय बिल मंजुरीसाठी ३६०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने या प्रकरणी सापळा कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नीच्या ₹२३,८१५/- रुपयांच्या वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५, रा. नेपाणे) यांनी ₹५,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ₹३,६००/- ठरली होती. या संदर्भात तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करत असताना मुख्याध्यापक महाजन यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाच स्वीकारण्यापूर्वीच विभागाने कारवाई करत आरोपीविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८५/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संदिप महाजन यांच्यावर वेतन निश्चितीच्या फरकाच्या ₹२,५३,७८०/- रुपयांवरून ५ टक्के लाचेची मागणी करून ₹१०,०००/- रु. स्वीकारल्याचा गुन्हा २७ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता (गु.र.क्र. १०५/२०२४). ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रदीप पोळ यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
तोरनाळा येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी
तोरनाळा (ता. जामनेर) | प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (चंदू भाऊ) बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह कार्यक्रमाला गणेश भाऊ राजपूत (माजी जिल्हा परिषद सदस्य, बुलढाणा), मयूर भाऊ पाटील (तालुका अध्यक्ष, जामनेर), नवल भाऊ पाटील (माजी सभापती, जामनेर), युवराज भाऊ पाटील (माजी सरपंच, तोरनाळा), विश्वजीत भाऊ (जामनेर), रमेश भाऊ राजपूत (सदस्य, ग्रामपंचायत तोरनाळा), तसेच आरोग्यदूत जालमसिंग भाऊ राजपूत (जामनेर) हे सन्माननीय उपस्थित होते. कार्यक्रमास तोरनाळा व परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले.
शहापूर येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ; २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासचे वितरण
शहापूर (ता. जामनेर) | प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील शहापूर गावात घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मा. विनय गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने ETP पास जनरेट करून खडकी नदीपात्रातून वाळूचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामार्फत घरकुल बांधणीसाठी आवश्यक वाळू सरकारी पातळीवरून मोफत देण्यात येत असून, गरजू लाभार्थ्यांना या सुविधेचा थेट लाभ मिळाला आहे. एकूण २०८ लाभार्थ्यांना ऑनलाईन पासेस वितरित करण्यात आले. उपस्थित मान्यवर:या कार्यक्रमावेळी तहसीलदार जामनेर, गटविकास अधिकारी जामनेर, ग्राम महसूल अधिकारी शहापूर, ग्रामपंचायत अधिकारी शहापूर, पोलीस पाटील शहापूर, व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तांत्रिक पारदर्शकता आणि सुलभता:ETP प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली गेली असून लाभार्थ्यांनी शासनाच्या या सुविधेचे स्वागत केले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, अशी भावना व्यक्त केली.
राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.
मुबंई (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग, धाराशिव, रायगड अशा बड्या जिल्ह्यांचा समावेश आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगरला झाली… तर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून वर्णी लागली आहे. सोमनाथ घार्गे यांच्या बदलीनंतर आंचल दलाल यांची रायगडच्या पोलीस अधीक्षक पदी निवड झाली आहे.धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे अधीक्षक तुषार दोषी यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागली आहे. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून वादग्रस्त ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची बदली नागपूरला राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ४ ला करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस आयुक्तालयात उप आयुक्त पदावर कार्यरत असलेले अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे.खालीलप्रमाणे झाल्यात पोलीस बदल्या –आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे पोलीस अधीक्षक, रायगडसोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड → पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरमहेंद्र पंडित – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर पोलीस उप आयुक्त, ठाणे शहरयोगेश गुप्ता – पोलीस अधीक्षक, नागरी सुरक्षा, नांदेड पोलीस अधीक्षक, कोल्हापूरबच्चन सिंग – पोलीस अधीक्षक, अकोला समादेशक,रा. पो. बल, गट क्र. 4, नागपूरराकेश ओला – पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, पोलीसउपदेश, बृहन्मुंबईअर्चित चांडक – पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर पोलीस अधीक्षक, अकोलामंगेश शिंदे – आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूरराजातिलक रोशन – सहायक पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस उप, बृहन्मुंबईबाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक, पालघरपोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीणयतिन देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, पालघरसौरभ अग्रवाल – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभाग, पुणेमोहन दहिकर – पोलीस उप आयुक्त, ठाणे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्गविश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा → समादेशक,रा. रा. पो. बल गट क्र. 9, अमरावती
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
ना गपूर (प्रतिनिधी) राज्य भर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वतः वंजारीच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याचीपाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.
लुबाडलेले 1600 रुपये काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात परत
पाचोरा – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखले जाते, याचे जिवंत उदाहरण नुकतेच पाचोरा येथे पाहायला मिळाले पत्रकार संदीप महाजन यांनी अनधिकृत रेल्वे तिकीट एजंटकडून भारतीय सैनिकाची करण्यात आलेली आर्थिक लुबाडणूक उघडकीस आणताच संबंधित भामट्याने युद्धजन्य परिस्थिती काळात अफरातफरीत केलेली फसवणूक लपवण्यासाठी केवळ काही मिनिटांतच सैनिकाच्या खात्यात 1600 रुपये परत वर्ग केले.ही घटना आहे पिंपरी सार्वे येथील रहिवासी आणि सध्या CISF मध्ये कार्यरत असलेल्या जवान प्रदीप बाविस्कर यांच्या बाबतीत. देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे जवानांना तातडीने त्यांच्या सेवास्थळी परत हजर राहण्याचे आदेश मिळाले होते. या घाईत त्यांनी रेल्वे तिकीट काढण्यासाठी पाचोरा येथील तिकीट एजंटची मदत घेतली. मात्र त्या एजंटने एका सामान्य तिकिटासाठी वाजवी रक्कमेपेक्षा तब्बल 1600 रुपये जास्त रक्कम आकारून लुबाडणूक केली.या प्रकाराची माहिती पत्रकार संदीप महाजन यांना मिळताच त्यांनी या विषयावर सखोल चौकशी केली आणि समाजमाध्यमांद्वारे, तसेच ‘ध्येय न्यूज’च्या माध्यमातून ही धक्कादायक बातमी सर्वांसमोर आणली. पत्रकारितेतील जबाबदारी आणि लोकहितासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून ही बातमी काही वेळातच व्हायरल झाली. बातमीचा समाजावर, प्रशासनावर आणि संबंधित एजंटवर इतका परिणाम झाला की, संबंधित एजंटने काही मिनिटांत जवानाच्या खात्यावर 1600 रुपयांची रक्कम परत पाठवली.ही घटना ही केवळ पत्रकाराच्या सचोटीची विजयगाथा नाही, तर हे एक जिवंत उदाहरण आहे की सत्याचे धारदार लेखणीसमोर अन्याय करणाऱ्यांची लाचारी उघड होते. पत्रकार महाजन यांनी या प्रकरणात कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ सैनिकाचा हक्क परत मिळावा या हेतूने ही बातमी उघडकीस आणली.या प्रकरणानंतर शहरातील जनमानसात पत्रकार महाजन यांच्या कार्याची भरभरून स्तुती होत असून अनेकांनी सोशल मीडियावर “हीच खरी पत्रकारिता” असे म्हटले आहे. शिवाय, यामुळे भविष्यात या आणि अशाप्रकारे लूट करणाऱ्या अनधिकृत रेल्वे एजंटांचा धसका बसेल व सामान्य नागरिकांची लुबाडणूक टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रशासनाने सुद्धा या भामट्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ माहिती पोहोचवणे नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार आहे, याचे हे अत्यंत प्रभावी उदाहरण आहे.
पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल — नामदार गिरीश भाऊ महाजन.
जामनेर -आज जामनेर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. जामनेर तालुका पशुधनाने समृध्द आहे. हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी तहसिलदार नाना साहेब आगळे , सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील , उपअभियंता एस बी चासकर , जितेंद्र पाटील यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जामनेर बसस्थानकात प्रवासी महिलेला लुटले; 25 ग्रॅम सोन्याची पोत चोरीला.
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती. या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .
