जामनेर -आज जामनेर येथील तालुका लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे भूमिपूजन नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे हस्ते करण्यात आले. जामनेर तालुका पशुधनाने समृध्द आहे. हे पशुधन उत्तमरित्या जपण्यासाठी नूतन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय उपयोगी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी तहसिलदार नाना साहेब आगळे , सा.बां विभागाचे कार्यकारी अभियंता आर डी पाटील , उपअभियंता एस बी चासकर , जितेंद्र पाटील यांचे सह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.