भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !

भारतीय सुरक्षा दलांना जळगावकरांचे अभिवादन !
जळगाव —
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले.

भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’ अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला.

यावेळी नामदार गिरीश महाजन ,खा. श्रीमती स्मिताताई वाघ, आ. श्री. सुरेशमामा भोळे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह जळगावकर विराट संख्येने सहभागी झाले.

error: Don't Try To Copy !!