जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.
मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती.
या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला.
या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत.
या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.