नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव..
जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
“१०,००० शेतकरी उत्पादक संघटनांची निर्मिती आणि प्रोत्साहन” या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत ‘गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीच्या’ उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे श्री.दिपक अग्रवाल सर,IAS, MD, (नाफेड) यांच्या हस्ते श्री. रोहन लोखंडे,मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री. प्रदिप महाजन, चेअरमन यांना सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली केंद्रीय क्षेत्र योजना अंतर्गत जामनेरच्या गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. नाफेड आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे कामकाज विविध क्षेत्रात सुरू आहे. यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यानी बांबू लागवड व विविध कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करुन कृषी क्षेत्रात क्रांतीसाठी हातभार लावावा असे प्रतिपादन श्री. अग्रवाल यांनी केले. यावेळी गोपद्म कंपनीला शेतकर्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाफेड कडून ‘नाफेड बाजार’ या त्यांच्या शाॅंपिग माॅल सुरू करणेस परवानगी पत्र देण्यात आले. यावेळी नाफेडने तयार केलेल्या देशातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १० ‘एफपीसींना गौरवण्यात आले. या सन्मान सोहळावेळी पंकज प्रसाद, अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, अनुराग तिवारी, महाव्यवस्थापक, पुजा टमटा, व्यवस्थापक, लिजा भटाचार्य,मोहनजी, व्यवस्थापक,इक्विटी अनुदान,व देशभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नाफेड कडून गोपद्म शेतकरी उत्पादक कंपनीचा गौरव.
